स्वच्छ भारत जनजागरणमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

0

इसिएने राबविला उपक्रम
चिंचवड: एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने पिंपरी-चिंचवड मनपा शाळांसाठी स्वच्छ भारत जनजागरण फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शहरातील सर्व शाळांमधून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मनपा स्वच्छ भारत विभाग प्रमुख अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो विद्यार्थी शिस्तबद्ध कार्यक्रम राबविले जात आहेत. 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्वच्छ भारत जनजागरण फेरीमध्ये खाजगी शाळांमधील 3600 विद्यार्थी सहभागी सहभागी झाले होते. चिंचवडगाव व यमुनानगर परिसरातील फक्त खाजगी शाळांचे सर्व विद्यार्थी व शाळा शिक्षक सकाळी 8.00 वाजता चाफेकर पुतळ्याजवळ जमा झाले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सहा.आयुक्त खोत, शिक्षण मंडळ सदस्या नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे, नीलकंठ चिंचवडे, इसिए विश्‍वस्त विकास पाटील, अनघा दिवाकर, मिनाक्षी मेरुकर, तेजस मेहता, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, शिकंदर घोडके, इंद्रजीत चव्हाण, सुभाष चव्हाण 19 खाजगी शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होते. आर.एम.बेद, एस.जी.इनामदार, एस.डी.निंबाळकर, सहा. प्रशासन अधिकारी पराग मुंडे व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

या स्वच्छता फेरीमध्ये 3600 हून जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सहभाग नोंदवून शहरातील रस्त्यांवर, गल्ली-बोळातून फिरून जोरदार व प्रभावीपणे सादरीकरण केले. नागरिकांना स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक शाळेच्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा, लेझीम पथक होते. शहरातील नागरिकांच्या मनात पर्यावरण संवर्धनाच्या बाबत सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) सदैव महापालिका धोरणांना पाठींबा दर्शवित असल्याचा उल्लेख, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अध्यक्षीय भाषणातून विशद केले.

Copy