स्वच्छ आणि सुंदर भारत बनविण्यासाठी चालना द्यावी

0

निंभोरा : ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचेे विशेष हिवाळी शिबिर जिल्हा परिषद मराठी शाळा धामोडी येथे नुकतेच संपन्न झाले. समारोपाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील हे होते. विद्यार्थ्यांनी शिबीर संपले म्हणून थांबू नये. सतत कार्यरत राहून स्वच्छ आणि सुंदर भारत बनविण्यासाठी चालना द्यावी, असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धामोडी सरपंच तरुणा पाटील, पोलीस पाटील, दत्तात्रय पाटील, वासुदेव पाटील, हरी पाटील, प्राचार्य जे.बी. अंजणे उपस्थित होते. सहा दिवसांच्या या शिबिरामध्ये श्रमदान व स्वच्छ भारत, कॅशलेस, बेटी बचाव आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली.

विविध विषयांवर तज्ञांनी केले मार्गदर्शन
यावेळी प्राचार्य जे.बी. अंजने यांनी मनोगत व्यक्त केले. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांमधून अंकिता चौधरी, दिप्ती पाटील, प्रियंका पाटील, गोपाळ कोळी, प्रविण कुमावत, सतिश पाटील, तसेच या सात दिवसात विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यासाठी निंभोरा एपीआय गणेश कदम स्पर्धा परिक्षा, बलवाडीचे एन.व्ही. पाटील जल पुनर्भरण, सावद्याचे प्रा. व्ही.पी. होले व्यसनमुक्ती, ऐनपूरचे प्र्रा.डॉ. के.जी. कोल्हे ऊर्जा बचत, निंभोरा येथील डॉ. संदिप पाटील अवयवदान, पत्रकार दिपक नगरे सोशल मिडीया, ऐनपूरचे प्रा.डॉ. एस.ए. पाटील जातीमुक्त भारत, प्रा. एस.आर. इंगळे पर्यावरण समस्या, निंभोरा स्टेट बँकेचे आशिष टेंभे एक पाऊल डिजीटल, ऐनपूरचे प्रा.डॉ. पी.आर. महाजन शौचालय जनजागृती, प्रा. दिलीप सोनवणे व दिलशाद खान व्यक्तिमत्व विकास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करुन तसेच रोज सकाळी योगा अभ्यास निंभोराचे डॉ. एस.डी. चौधरी यांनी घेतला. यावेळी प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश वैष्णव यांनी केले. सुत्रसंचालन सहाय्यक प्रा. जयंत नेहेते यांनी तर आभार प्रा.डॉ. निता वाणी यांनी मानले. शिबिरास नितीन महाजन, अविनाश पाटील, निलेश महाजन यांनी सहकार्य केले.