‘स्लमडॉग मिलियनेर’ अभिनेत्री फ्रिडा पिंटोही अडकणार विवाहबंधनात

0

मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये लग्नाचा सीजन सुरु आहे. ‘दीपवीर’ नुकतेच विवाहबंधनात अडकले. यानंतर डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनसही लग्न करणार आहे. ‘स्लमडॉग मिलियनेर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री फ्रिडा पिंटोही लग्न करण्याची माहिती समोर आली आहे.

फ्रिडा पिंटो बऱ्याच दिवसांपासून कोरी ट्रॅनला डेट करत आहे. कोरी पेशाने फोटोग्राफर आहे. हे दोघेही आपल्या रिलेशनशीपबाबत गंभीर आहेत. तसेच दोघेही पुढील वर्षी लग्न करतील. फ्रिडाच्या लग्नाला मोजकेच लोक येणार असल्याची माहिती आहे. जिथे केवळ कुटुंबातील व जवळचे नातेवाईक उपस्थित राहतील.