स्मृती इराणी यांनी देखील सांगितला त्यांचा गोत्र !

0

नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा गोत्राबाबत खुलासा केला आहे. एका तरुणाने ट्वीटरवरून स्मृती इराणी यांना त्यांच्या गोत्राविषयी विचारणा केली. त्याला उत्तर देतांना स्मृती इराणी यांनी मेरा गोत्र कौशल आहे असे सांगितले आहे. माझे वडील, वडिलांचे वडील हे कौशल गोत्राचे आहे. माझे पती आणि मुल पारसी आहेत त्यामुळे त्यांचे कोणतेही गोत्र नाही. मी हिंदू धर्मावर विश्वास ठेवते त्यामुळे मी सिंदूर लावते असे उत्तर दिले आहे.

मी हिंदुस्थानी आहे, माझे कर्म हिंदुस्थानी आहे, माझे विश्वास हिंदुस्थानी आहे असा असे स्मृती इराणी यांनी ट्वीटरवर सांगितले आहे.

पाच राज्यात निवडणूका होत आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. राजस्थान दौऱ्यावर असतांना राहुल गांधी यांनी त्यांच्या गोत्र आणि जातीविषयी स्पष्टीकरण दिले होते.