स्मिथ, मार्शने शतके ठोकत दिला इशारा

0

मुंबई । स्टीव्ह स्मिथ आणि शॉन मार्श या अनुभवी फलंदाजांनी शानदार शतके झळकावत ब्रेबॉर्न स्टेडियमवर चालू असलेल्या तीनदिवसीय सराव सामन्याच्या दुसर्‍या दिवशी 7 बाद 469 धावांवर डाव घोषित केला. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 327 अशी समाधानकारक मजल मारली होती. स्मिथ आणि मार्श यांनी शतकानंतर वैयक्तिक डाव सोडला होता. भारत अ संघाने चांगली सुरुवात करत 4 बाद 176 असे प्रत्युत्तर दिले असून श्रेयस अय्यर शतकाच्या उंबरठ्यावर खेळत आहे.

गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी 
दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने मिशेल मार्श 75 व मैथ्यू वाडे 64 तसेच पीटरच्या 45 धावांच्या उपयुक्त खेळीच्या बळावर 469 धावांवर केला डाव घोषित केला. भारतीय ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु यजमान गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (25) आणि मॅट रेनशॉ (11) लवकर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची 2 बाद 55 अशी अवस्था झाली होती. मात्र यानंतर स्मिथ (107) आणि मार्श (103) यांनी जोरदार सराव केला. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. अखिल हेरवाडकर 4 धावांवर बाद झाला. तर प्रियांक पांचाल 36 धावांवर बाद झाला. कर्णधार पंड्या आणि अंकित बावणे यांनाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र दुसरीकडून श्रेयस अय्यरने 85 धावांची नाबाद खेळी केली आहे.