‘स्मार्ट सिटी’चे भाजपसमोर आव्हान!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाला आता निवडणुकीतील आश्‍वासनांसह स्मार्ट सिटी प्लॅन यशस्वी करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आलो तर राष्ट्रवादीपेक्षा पाचपट या शहराचा विकास करू, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करण्यासाठी नूतन महापौर नितीन काळजे यांना कंबर कसावी लागणार आहे. स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी, शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, यशवंतराव स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय करणे, स्वारगेट ते पिंपरीदरम्यान मेट्रो लाईन आणि ताथवडेचा विकास याबाबत भाजपनेत्यांनी भरभरून आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांची पूर्त करण्याचे आव्हान शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे यांच्यासमोर उभे ठाकले आहे. शिवाय, गेल्या 11 वर्षांपासून पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणाला लोकनियुक्त अध्यक्ष नाही. शिवसेना-भाजपच्या वादात हे अध्यक्षपद रखडलेले आहे. अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे मार्गी लागले तर प्राधिकरणात निर्माण झालेल्या समस्याही सुटण्यास साहाय्य होणार आहे.

प्राधिकरणाचा लालदिवा कुणाला?
महापालिका निवडणुकीत अनेकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाल दिवा देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता आली आहे. तेव्हा प्राधिकरणाचा लाल दिवा कुणाला मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागलेलेे आहे. सध्या प्राधिकरणातील रहिवासी नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच, अनेक विकासाचे प्रश्‍नही रखडलेले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने लोकनियुक्त अध्यक्ष देण्याची गरज आहे. 1972 मध्रे स्थापन झालेल्रा या प्राधिकरणावर आतापर्रंत 21 शासकीर अधिकार्‍रांनी अध्रक्ष म्हणून काम केले आहे. केवळ सात लोकनिरुक्त अध्रक्षांनी प्राधिकरणाचा कारभार चालवला. सन 2001 ते 2004 पर्रंत बाबासाहेब तापकीर हे अध्रक्ष होते. त्रांच्रानंतर प्राधिकरणाला लोकनिरुक्त अध्रक्षपद मिळालेले नाही. त्रानंतर रा पदावर विभागीर आरुक्तच अध्रक्ष म्हणून काम करत आहेत. सध्रा पुणे विभागीर आरुक्त प्राधिकरणाचे अध्रक्ष म्हणून काम पाहत आहेत. आघाडी सरकारच्रा काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस रा दोन्ही पक्षातील वादांमुळे रा पदावर दोन्ही पक्षातील कोणत्राही कार्रकर्त्रांची निवड झाली नाही. तिच परिस्थिती आता भाजप-शिवसेना सरकारच्या काळातही उद्भवलेली आहे. शिवसेनादेखील प्राधिकरणाचे अध्यक्षपद मागत असल्याने हा प्रश्‍न मार्गी लागू शकलेला नाही.

‘वायसीएम’मध्ये मेडिकल कॉलेजला प्राधान्यता!
महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा पाचपट विकास करू, असे आश्‍वासन दिले होते. आता या आश्‍वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांसह महापौरांवर आली आहे. महापालिकेतर्फे चालविल्या जाणार्‍या स्व. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय चालू करणे ही आमची प्राथमिकता असल्याची ग्वाही भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी दिली आहे. शिवाय, स्मार्ट सिटी प्रकल्पाचीदेखील अंमलबजावणी करणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याशिवाय, शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय निर्माण करण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही आ. जगताप यांनी सांगितले.