स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज –जयंत पाटील यांची टीका

0
मुंबई– हे राज्य बाबासाहेबांच्या विचारांप्रती कटिबध्द असलेले राज्य आहे.त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्मारक बांधण्याबाबत राज्य गहाण टाकण्याच्या केलेल्या वक्तव्यावर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची दहा स्मारके बांधण्याची राज्याची क्षमता आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राज्याची तिजोरी अक्षरश: खिळखिळी करुन टाकली आहे. राज्य गहाण ठेवण्याची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. यावरुन त्यांची राज्याप्रती आस्था दिसून येते अशी टिकाही पाटील यांनी केली आहे.
Copy