स्मशानभुमी परिसरातील मुलांना कपडे वाटप

0

भुसावळ : येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांनी आपल्या मुलाचा जन्मदिन थाटामाटात साजरा न करता स्मशानभूमी परिसरात राहणार्‍या गोरगरिब मुलांना कपडेवाटप करुन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला.
डॉ. पाटील यांचा मुलगा वेदांत याचा वाढदिवस असल्याने डॉ. पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सामाजिक कार्याद्वारे वाढदिवस करण्यासाठी तापी नदीकाठावरील स्मशानभूमी परिसरात राहणार्‍या रणधिर परिवाराला भेट देवून येथील गोरगरिब मुलांना कपडेवाटप केले. यावेळी डॉ. रेणुका पाटील यांसह परिसरातील चिमुकले उपस्थित होते.