स्फोटात झिरो वायरमनचा भाजला हात

0

जळगाव- मेहरूण परिसरातील तांबापुरामधील सिमेंट गोडाऊनजवळ रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करताना अचानक स्फोट झाल्याने झिरो वायरमनचा हात भाजला. त्याला उपचारासाठी त्याच्या सहाकार्‍यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालात दाखल केले. घटना घडल्यावर एक तासानंतरही महावितरण कंपनीचा एकही अधिकारी जखमी वायरमनची विचारपूस करण्यासाठी आलेले नव्हते.
तांबापुरातील सिमेंट गोडाऊनच्या बाजुला असलेल्या ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त झाले होते. रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झिरो वायरमन अरविंद मच्छींद्र सोनवणे (वय 31, रा. शिवकॉलनी) हे दुरूस्ती करण्यासाठी गेले. दुरूस्ती सुरू असताना कट आऊट अचानक शॉर्ट झाल्याने स्फोट झाला. त्यामुळे स्फोटात अरविंद सोनवणे यांचा हात भाजला. तसेच छाती जवळही भाजले. यानंतर त्यांना काही नागरिकांनी सायंकाळी उपचारसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अरविंद सोनवणे हे घरी रवाना झाले. तसेच त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले.