स्पुटनिक व्ही कोरोना लस सर्वात प्रभावी

कोरोनाचा पर्दुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार तर्फे मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.मात्र मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर त्वरित लसीकरण हा एक महत्वाचा पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे.याच पर्वभूमीवर १ मे पासून १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकाचे लसीकरणही सुरु झाले आहे. देशात सध्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसी उपलब्ध आहेत. मात्र यातील सर्वात चांगली लास कोणती हा प्रश्नही नगरींच्या मनात येत आहे. स्पुटनिक व्ही ही लस सर्वात प्रभावी आहे. ती ९१.६ टक्के इतकी कारगर आहे.

प्रभावीपणाचा विचार केला तर सर्वच लासी लस फार प्रभावी आहेत. तिन्ही लसी डब्लीव.एच.ओ. च्या मानके पूर्ण करतात. अद्यापही यांचे क्लिनिकल चाचण्यांमधून डेटा येत आहेत आणि या लस किती प्रभावी आहे याबाबत अभ्यास सुरू आहे. कोविशिल्ड या लसीची एफिकसी ७० टक्के इतकी आहे. दोन डोसमधील अंतर वाढवल्यानंतर ती अधिक वाढते. ही लस केवळ गंभीर लक्षणांपासून वाचवत नाही तर बरे होण्याची वेळही कमी करते. म्हणजेच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्यात तो लवकर बरा होतो. कोव्हॅक्सिन या लसीची एफिकसी ७८ टक्के आहे. गंभीर लक्षण रोखण्यासाठी आणि मृत्यू टाळण्यासाठी ही लस १०० टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं जात आहे.