स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत साइना नेहवाल पराभूत

0

नवी दिल्ली । ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची साइना नेहवाल पराभूत झाली.त्यामुळे या स्पर्धेतील भारतीची उमेद संपली आहे.या स्पर्धेत अशी आशा होती की पी.व्ही.सिधू व साइना नेहवाल या उपांत्यफेरीत दिसतील असे वाटले होते. मात्र या सर्व आशा संपुष्टात आल्या आहे. साइना नेहवाल 20-22,20-22 च्या अंतराने कोरियाच्या संग जी हून बरोबर पराभूत झाली.

या सामन्यात साइनाची सुरवात संथ होती,जेव्हाकी कोरियाच्या खेळाडूने सुरवाती पासून आपली गती कायम ठेवली होती.पहिल्या संग जी ने 3-1 स्कोर झाला होता.यानंतर साइनाने 7-7 ची बरोबरी केली.साइना ने अत्यंत मेहनतीने 11-7 स्कोर उभा केला मात्र ती त्याला कायम ठेवू शकली नाही. साइना पहिल्या सेटमध्ये दोन वेळ आघाडी घेतली.