स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी इंग्रजी आत्मसात करण्याची गरज

0

भुसावळ : सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असून इंग्रजीकडे दुर्लक्ष न करता हि भाषा आत्मसात करण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी यांनी केले. पंचायत समिती सभागृहात शिक्षण विभागमार्फत जिल्हा परिषदेच्या 11 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ‘लेट्स रिड अँड राईट इंग्लिश’ या नावीन्यपूर्ण ई- लर्निंग उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

ई-लर्निंग डीव्हीडीचे अनावरण
यावेळी मान्यवरांचे हस्ते ई-लर्निंग डीव्हीडीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पवार यांनी करतांना इंग्रजी भाषेचे शिक्षण कृतीयुक्त व हसत- खेळत दिल्यास मुलं इंग्रजी शिकू शकतात. ई- लनिर्ंगचा वापर यासाठी प्रभावी ठरेल असे सांगीतले.

शिक्षकांनी सहभाग घ्यावा
राजेंद्र चौधरी यांनी इंग्रजी बाबत हा प्रयोग जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पहिला प्रयोग असून सर्व शिक्षकांनी मनापासून सहभाग घ्यावा. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे सांगीतले. या उपक्रमांतर्गत 55 विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रागिनी चव्हाण यांनी तर आभार सुमित्र अहिरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय गायकवाड, नावीद खाटीक, देवानंद वाघधरे, शैला कुमावत, चेतना धांडे, यशवंत धायगुडे यांनी परिश्रम घेतले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी सुभाष मावळे, प्रशासन अधिकारी डी.टी. ठाकूर, सीएलआर संस्था पुणेच्या प्रकल्प अधिकारी सुजाता दिवाण, गटशिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण उपस्थित होत्या.