स्थायी समितीत महाग टॅब खरेदीला विरोध

0

जळगाव । गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेतर्फे शाळांना टॅब देण्याचा विषय सुरु आहे. गुरुवारी 2 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा हा विषय कायम करण्यात आल्यावर स्थायी समिती सदस्यांना याचा विरोध केला. विद्यार्थ्याना 19 हजार रुपये किंमतीचे टॅब देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेतर्फे मांडण्यात आला. सदस्यांनी इतक्या महाग किंमतीचा टॅब खरेदी न करता 6 ते 7 हजार किमतीचे टॅब खरेदी करुन शाळा संख्या वाढविण्याची मागणी केली. महाग किंमतीमुळे कमी शाळांना टॅब मिळणार आहे त्यापेक्षा कमी किमतीचे टॅब खरेदी केल्यास उर्वरीत शाळांनाही याचा लाभ होइल असा मुद्दा सदस्यांनी मांडला. 50 लाख रुपये टॅब खरेदीसाठी प्रस्तावित असून त्यासाठी टेन्डरींग काढण्यात आले आहे.

दोन दिवशीय क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी आपले विविध शंका उपस्थित केल्या. विद्यार्थ्यांचे शंका समाधान चंद्रकांत भंडारी यांनी केले. या क्षेत्रभेटीत 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी या दोन दिवसात आलेले अनुभव आपल्या पालकांना सांगत त्यावर लिखाण देखील केले आहे.