स्थायी सभापतींसह आठ सदस्य निवृत्त

0

चिठ्ठया टाकून केली प्रक्रिया, 1 ऑक्टोबरपर्यंत मुदत

जळगाव-मनपा स्थायी समितीतील 16 सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्तीच्या प्रक्रियेसाठी सभापती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभा झाली.दरम्यान,निवृत्त करण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या असून यात सभापतींसह आठ सदस्य निवृत्त झाले.यामध्ये भाजपचे पाच,शिवसेना दोन तर एमआयएमचे एक सदस्यांचा समावेश असून दि. 1 ऑक्टोंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

मनपा स्थायी समितीची विशेष सभा सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त अजित मुठे, उत्कष गुटे, मिनीनाथ दंडवते, नगरस चिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला नगरसचिव गोराणे यांनी सदस्य निवृत्तीसंदर्भात मुंबई मनपा अधिनियमाबाबत माहिती दिली.

अशी झाली निवृत्तीची प्रक्रिया
स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्तीसाठी 16 सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठया एका गोल फिरणार्‍या ड्रम मध्ये टाकण्यात आल्या.त्यानंतर चार विद्यार्थ्यांकडून आठ चिठ्या काढण्यात आल्या. यात ज्या सदस्यांच्यानावांची चिठ्ठी निघाली त्यांचे नाव सभागृहात जाहीर करण्यात आले.निवृत्त सदस्यांमध्ये सभापती जितेंद्र मराठे, मयूर कापसे प्रतिभा पाटील,उज्वला बेंडाळे, सुरेश सोनवणे,नितीन लढ्ढा, नितीन बरडे ,रिजाज बागवान यांचा समावेश आहे.

आठ सदस्य कायम
स्थायी समितीतील 16 सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त झाले.तर आठ सदस्यांना पुन्हा संधी मिळाली.यात प्रवीण कोल्हे, दिलीप पोकळे, अ‍ॅड.शुचिता हाडा, सुनील खडके, चेतन सनकत, सदाशिव ढेकळे, भगत बालाणी, विष्णू भंगाळे यांचा समावेश आहे.सदाशिव ढेकळे आणि भगत बालाणी हे भाजपचे दोन सदस्य घरकुल प्रकरणात कारागृहात आहेत.

सभापतींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांचा देखील निवृत्त सदस्यांमध्ये समावेश आहे.सभापती पदासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र सभापती मराठे यांची पुन्हा स्थायी समितीवर निवड करुन सभापतीपद देण्याची शक्यता आहे.

Copy