स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांमुळे वाचले तरुणाचे प्राण

0

जळगाव: शहरातील राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पूल जकात नाक्याजवळ मालवाहू चार चाकी समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. यावेळी येथून जात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एका मालवाहू गाडीचा दरवाजा तोडून चालकाला तत्काळ बाहेर काढले व ताब्यात असलेल्या शासकीय वाहनातून रुग्णालयात दाखल करून चालकाचे प्राण वाचविले आहे.

अशोक सुकदेव रोकडे रा.पिंप्राळा असे जखमीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, राजेंद्र पवार, प्रीतम पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील अशी तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहे. दरम्यान जखमी अशोक रोकडे यांचा भाऊ चाळीसगाव येथे पोलीस कर्मचारी असून त्याने कर्मचाऱ्यांचे भावना विवश होऊन आभार मानले आहे.

Copy