स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी

0

जळगाव :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू गंगाधर रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक प्रविण मुंढे यांनी काढले आहेत.

पोलिस निरीक्षकांसह पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी रात्री उशीरा पारीत केले. यात रोहम यांचाही समावेश असुन कायदा व सुव्यवस्था तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने ही बदली करण्यात आल्याचे कारण त्यात नमूद करण्यात आले आहे.

मेहुणबारे येथील लाखोंच्या गुटखा प्रकरणात यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ७ पोलिस कर्मचार्‍यांसह मेहुणबारे येथील सहायक पोलिस निरीक्षक यांना निलंबित केले आहे. याच गुटखा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी आता कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.