स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

0

जळगाव । जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर व अपर पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. गुरूवारी पथकाने जिल्ह्याभरात अवैध दारू विके्रत्यावंर धाड टाकत कारवाई केली. यावेळी पथकाने 42 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अवैध दारू विके्रत्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या ठिकाणी मारला छापा
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एमआयडीसी हद्दीतील मुल कंपनीच्या शेजारी भिंतीच्या आडोशाला असलेल्या अवैध दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून ज्ञानेश्‍वर भगवान पाटील, राजसिंग राजुपत यांना अटक करून तेथून 27 हजार 490 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यानंतर पथकाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील अजीत टायर दुकानाजवळ नारायण सोनवणे व मनोज पान्डे हे अवैध दारू विक्री करतांना पकडले. यावेळी त्यांच्याकडून 4 हजार 7 रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. पथकाने अमळगाव येथे धाड टाकत चंद्रभान रामचंद्र कोळी यास अटक करून 3270 रुपयांची दारू जप्त केली. तर मारवड येथील इंदिरानगर येथेही धाड टाकून पथकाने बाबुलाल कोळी यांच्यावर कारवाई करत 4300 रुपयांच्या गावठी दारू जप्त केली. तर चिखली व पाळधी बु. येथेही धाडी टाकून पथकाने योगेश सोनवणे व सचिन गुजर यांच्यावर कारवाई करून 2550 रुपयांची दारू जप्त केली असा एकूण 42 हजार 410 रुपयांची अवैध दारू पथकाने जप्त केली.

पोलीस दलातर्फे रविवारी आरोग्य शिबीर
जळगाव- जिल्हा पोलीस दल व मुक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी 29 जानेवारी रोजी पोलीस कुटूंबियांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर हे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत असून या शिबीरात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटूंबियांचे तज्ञ डॉक्टरांकडून उपचार, मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर शिबीर सकाळी 8 वाजता मंगलम हॉल येथे आयोजित करण्यात आले असून शिबीरात जास्तीत जास्त कुटूंबियांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबीरात रक्तदाब, मधुमेह, इसीजी, अंगावरील गाठी, सुज येणे, हर्निया, सांधे दुखी, गुडघे दुखी, हातपाय दुखणे, महिलांचे विविध विकार, दंत विकार, मानसिक ताणतणाव आदींची तपासणी करण्यात येणार आहे.