‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी आठ रेल्वे कनेक्ट

0

नवी दिल्ली: जगातील सर्वात उंच असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याशी आठ रेल्वे जोडले जाणार आहे. आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना हिरवा झेंडा दाखविण्यात आले. या रेल्वे केवडियाला (स्टॅच्यू ऑफ यूनिटी) वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार आहेत.

केवडिया रेल्वेस्थानक अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असून, हे देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकीट प्राप्त रेल्वेस्थानक आहे. रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध शहारांमधून गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला पाहण्यासाठी पर्यटकांना सहजरित्या येता येणार आहे. या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात भव्य अशा स्टॅच्यू ऑफ यूनिटीला देखील स्थान मिळणार आहे. तसेच, यामुळे गुजरातमधील पर्यटनास देखील मोठी चालना मिळणार आहे. या अगोदर स्टॅच्यू ऑफ यूनिटी पाहण्यास जाण्यासाठी पर्यटकांना वडोदरा, भरूच आणि अंकलेश्वर रेल्वेस्थानकावर पोहचावे लागत होते.

Copy