स्टार फुटबॉलर रोनाल्डोचे आता अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल

0

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर अनेक खेळाडू आपल्या खेळातील जादू दाखवत असतानाच आपल्या स्मार्टनेसच्या बळावर अभिनयाच्या क्षेत्रात उतरल्याची उदाहरणे आहेत. जाहिरातीच्या किंवा मॉडेलिंगच्या क्षेत्रात देखील अनेक स्टार खेळाडूंनी बाजी मारली आहे. आता पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टीआनो रोनाल्डो लवकरच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकत आहे. एका प्रसिद्ध तुर्की टिव्ही सिरीयलमध्ये तो अभिनय करणार असून त्यात अमेरिकेची हॉट अॅक्ट्रेस अँजेलिना जोली त्याच्याबरोबर काम करणार आहे.

सिरीयाई बॉर्डरशी संबंधित कथा

कोपस युसो नावाची ही सिरीयल तुर्कीच्या दक्षिणपूर्व सिरीयाई बॉर्डरशी संबंधित असून त्यात गृहयुद्धातून स्वतःचा बचाव करून तुर्कस्थानात शरणार्थी म्हणून आलेल्या सिरीयन परिवाराची कहाणी सांगितली जाणार आहे. रोनाल्डोने या पूर्वीही त्याला अभिनयाची आवड असल्याचे व फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर या क्षेत्रात नशीब अजमावून पाहणार असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या सिरीयलचे शूटिंग सुरू होत असून ती तुर्कस्तानसह मिडलइस्ट व लॅटिन अमेरिकन देशांतही प्रसारित केली जाणार आहे.

ब्रेट लीचा अनइंडियन

एखाद्या क्षेत्रात यशस्वी होऊन माणूस ‘सेलिब्रिटी’ झाला की, मग त्याने काहीही केले तरी त्याचे कौतुक होतेच. खेळाडूंचे देखील असेच आहे. खेळाडू म्हणून यशस्वी झाल्यानंतर तो मॉडेल बनतो, अभिनय करतो, रॅम्पवर चालतो. अलीकडेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने त्याच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले आहे. याचबरोबर ब्रेट ली नुकतेच अनइंडियन नावाच्या सिनेमात देखील दमदार भूमिका निभावली आहे. ‘अनइंडियन’ चित्रपट लव्हमेकिंग सीन्सवरुन विवादात सापडला होता.या चित्रपटात ब्रेट ली आणि अभिनेत्री शर्मिष्ठा चॅटर्जी यांच्यात काही लव्हमेकिंग सीन्स चित्रीत झाले आहेत.

क्रिकेटपेक्षाही अभिनय आव्हानात्मक

क्रिकेट खेळत असताना माझी कारकीर्द प्रत्यक्ष बहरत गेली आणि अनेकाविध कॅमेरे ते क्षण टिपत गेले. पण, कॅमे-यासाठीच स्क्रीप्टप्रमाणे स्वतः अदाकारी करण्याचा प्रसंग आला, त्यावेळी तो माझ्यासाठी खूप मोठा बदल होता. खूप मोठे आव्हान होते. एका अर्थाने क्रिकेटपेक्षाही अभिनय हे बरेच आव्हानात्मक आहे, त्याची प्रकर्षाने जाणीव झाली’, असे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने म्हटले होते. ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चरित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सचिनने क्रिकेट व अभिनयाच्या क्षेत्रातील मुख्य फरक प्रामुख्याने अधोरेखित केला होता.