स्केटींगच्या खेळामुळे शहराचे नावलौकीक वाढेल – आमदार महेश लांडगे

0

प्रभाग क्र.8 इंद्रायणीनगर से.क्र.3 मध्ये स्केटींग ग्राऊंडचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड : राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद यांनी कबड्डी या खेळात पिंपरी चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करुन जास्तीत जास्त राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण होणार असून स्केटींग खेळामुळे शहराच्या नावलौकीकात भर पडणार असल्याचे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.8 इंद्रायणीनगर से.क्र.3 मध्ये नव्याने विकसित केलेल्या स्केटिंग रिंक ग्राऊंडचे राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद असे नामकरण करण्यात आले. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार महेश लांडगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

2 कोटी 27 लाख खर्च..

राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंक ग्राउंड हे 2.47 एकर जागेत तयार केले आहे. पिंपरी चिंचवड मधील एकमेव रिंक आहे. 200 मी.परिघाचे स्केटिंग रिंक नवोदित खेळाडूंसाठी, 100 मी. सराव रिंक, त्यासाठीचे कोटींग परिसराला सिमा भिंत, वाहनतळ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची, इ. सोयी सुविधासह कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत. या कामी एकूण 2 कोटी 27 लाख खर्च आलेला आहे. हे ग्राउंड शहरातील खेळाडूंना वरदानच ठरणार आहे.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती….

या कार्यक्रमास क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसदस्य नितीन लांडगे, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, स्विकृत सदस्य विजय लांडे, गोपीचंद धावडे, माजी नगरसेवक दत्ताकाका लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता आंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय घुबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे, आकाश कंद, विजय फुगे, गणेश फुगे, अविनाश शिंदे, समीर ढगे, नितीन धोत्रे, मारुती लांडगे, भगवान जाधव, विकास यादव, सुनिल गुजर, माधव धावडे, युवराज लांडगे, संभाजी फुगे, पांडुरंग धावडे, रामदास मेदनगर, महेंद्र मेदनकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आकाश कंद यांनी केले. सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले. आभार क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी मानले.

Copy