स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करण्याच्या सूचना

0
भोसरी : महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणार्‍या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे.  खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत. वर्षभरापासून त्याचे काम सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी (दि.26)पालिकेच्या अधिका-यांसमवेत कामाची पाहणी केली. त्यावेळी आमदार लांडगे यांनी अधिकार्‍यांना काम दर्जेदार करण्याबरोबरच विविध सूचना दिल्या आहेत. यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता राहुल जन्नू, निलेश केदार, वास्तूविशारद पंकज कांबळे, राहुल राणे, योगेश कुमावत, ठेकेदार आनंद निकुंभ, मंदार कुलकर्णी उपस्थित होते.
Copy