सौ.शांतीदेवी चव्हाण पॉलीटेक्नीक मध्ये सुरक्षा सप्ताह

0

चाळीसगाव । महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळ चाळीसगावतर्फे सौ.शांतीदेवी चव्हाण पॉलीटेक्नीक भोरस ता.चाळीसगाव येथे सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत वाघ हे होते. तसेच कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून कार्यकारी अभियंता एन. के सोनावणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. बी. जोशी व प्रताप सपकाळ व सहाय्यक तंत्रज्ञ उपस्थित होते. शॉक लागल्यानंतर कशा पद्धतीने आपला जीव वाचवता येईल याची खबरदारी घेऊन कोणता प्रथम उपचार करावा तसेच आपण आपल्या सोबतच हजारो ते लाखो लोकांचे प्राण काही सेकंदात कसे वाचवू शकतो त्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य प्रशांत वाघ यांना मुलांनी प्रश्न विचारले असता सर्व शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात वीज संबंधी होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी उपाय सुचिवले प्रा.नितीन बागुल यांनी
आभार मानले.