सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथीतर्फे योग शिबिराचे आयोजन

0

जळगाव – सध्या धावपळीच्या जीवनात महिलांना अनेक प्रकारच्या शारिरीक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करुन ‘सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अ‍ॅण्ड नॅचरोपॅथी’ एम.जे.कॉलेज द्वारा खास 30 ते 50 वयोगटातील महिलांसाी योग शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी या वयोगटातील सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबिर ‘योग हॉल’ मुलींचे वसतिगृह एम.जे.कॉलेज येथे 1 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान घेतले जाणार आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क वैशाली मेंडकी मो. 8208341275, हर्षदा भिरुड, पूनम वाघ, पूनम पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

Copy