सोसाट्याचा वारा व मुसळधार पावासामुळे झाली धावपळ

0

तळेगाव : सोसटयाचा वारा, विजेचा कडकडाट व मुसळधार पाउस यामुळे येथील रविवारच्या आठवडे बाजारामध्ये व्यापारी व ग्राहकांची जोरदार धावपळ झाली. येथे नेहमी प्रमाणे प्रत्येक रविवारी आठवडे बाजार भरत असतो. मान्सूनच्या परतीच्या पावसाने गेले दोन ते तीन दिवस चांगलाच जोरदारपणे पडत आहे.

रविवारी दुपारच्या दरम्यान या पावसाने वेगळे रूप धारण केले होते. रविवारचा आठवडे बाजार असल्याने अनेक व्यापारी भाजीपाला, फळे, कडधान्ये इत्यादी माल विक्रीसाठी घेऊन येतात. तसेच तळेगाव व परिसरातील अनेकजण भाजीपाला खरेदीकरण्यासाठी येत असतात. रविवारी दुपारी हा मान्सूनच्या परतीच्या पाऊस, सोसटयाचा वारा, विजेचा कडकडाटसह आला. त्यामुळे खरेदी करण्याकरिता आलेले ग्राहक व विक्री करणारे व्यापारी यांनी विक्रीसाठी आणलेला माल या पावसाने भिजला गेला. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही या पावसामध्ये भिजत भिजत खरेदी करावी लागली.

Copy