इंदोरहून रावेरात आलेल्या कुटुंबाला जळगावात तपासणीसाठी हलवले

0

रावेर : इंदौर शहरातून रावेरला आलेल्या एका कुटुंबाला येथील ग्रामीण रुग्णालयाने पुढील तपासणीसाठी जळगावला शुक्रवारी पाठवले असून त्यांची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आली मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

आरोग्य विभागाला अहवालाची प्रतीक्षा
रावेर शहरातील रहिवासी असलेला इसम इंदौरच्या कंपनीत कामाला आहे मात्र लॉकडाऊन झाल्याने पत्नी व सात महिन्यांच्या मुलीसह ते रावेरात 30 मार्च रोजी परतले होते तर इंदौर येथे या कुटुंबाच्या शेजारी राहणार्‍या एका नर्सचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती या कुटुंबाला कळाल्यानंतर तसेच 28 वर्षीय महिलेला खोकल्याचा त्रास होत असल्याने शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात ती उपचारासाठी आली होती. या महिलेने दिलेल्या माहितीवरून वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी या महिलेसह तिचा पती व सात महिन्याच्या बाळाला पुढील तपासणीसाठी शुक्रवारी जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांचा याबाबतचा रीपोर्ट अद्यापपर्यंत प्राप्त झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.