सोशल मिडीयावर वीरमातांची बदनामी करणार्‍यांवर कारवाईची मागणी

0

चाळीसगाव । राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, आहील्यादेवी होळकर व रमाबाई आंबेडकर या महामातांचे फोटो व्हाट्स अ‍ॅप प्रोफाईल वर ठेवून त्यावर आक्षेपार्ह असा स्टेट्स लिहून त्यांची बदनामी करणार्‍या समाजकंटक याचा चाळीसगाव येथील रयत सेना, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व उमंग महीला परिवाराच्या वतीने बुधवार 25 जानेवारी 2017 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर निषेध करण्यात आला. या माथेफिरूचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यास अटक करावी अशी मागणी तहसीलदार चाळीसगांव यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, आहील्यादेवी होळकर व रमाबाई आंबेडकर या महामातांनी समाजात आदर्श निर्माण करून समाज घडविण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे आदराने नाव घेतले जाते अशा महामातांचे फोटो सोशल मिडीयाच्या व्हाट्सअप प्रोफाइल वर टाकून त्याठिकाणी आक्षेपार्ह मजकूर टाकून या महामातांची बदनामी केली.

समाजकंटकांवर कारवाई करण्याचे तहसिलदारांना निवेदन
समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार एका समाजकंटक माथेफिरूने केला आहे. त्याचा चाळीसगाव येथे रयत सेना, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व उमंग महीला परिवाराच्या वतीने दि. 25 जानेवारी 2017 रोजी दुपारी निषेध करून तशा आशयाचे निवेदन तहसीलदार कैलास देवरे यांना देण्यात आले आहे. या समाजकंटकाचा शोध घेऊन त्यास लवकरात लवकर अटक करून त्याचेवर योग्य ती कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या जयश्री रणदिवे, रयत महीला सेना तालुकाध्यक्षा जयश्री माळी, उमंग महीला परिवाराच्या अध्यक्षा संपदाताई पाटील, रत्नप्रभा नेरकर, सुवर्णा राजपूत, ज्योती पाटील, साधना पाटील, ललीता पिंगळे, तसेच रयत सेनेच्या निकीता परदेशी, कोमल गायकवाड, राणी गुजर, दिपीका निकम, वैशाली चौधरी, रूपाली गायकवाड, कविता पाटील, पुजा सोनवणे, गायत्री कोठावदे, प्रज्ञा शिरूडे व रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, समन्वयक पी.एन.पाटील, सचिव प्रमोद वाघ, तालुकाध्यक्ष बंटी पाटील, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष रोहीत कोतकर, पंकज, पाटील, शुभम देशमुख, कृष्णा जाधव, अजय चव्हाण, स्वप्नील गायकवाड, भुषण पाटील, सागर नागणे, रोहीत जाधव, आदी उपस्थित होते.