सोशल माध्यमांचा अनावश्यक वापर तरुणींसाठी ठरु शकतो घातक

0

जळगाव: सोशल मीडियाचा अनावश्यक वापर करणार्‍या तरुणींना फोन कॉल्स, त्याव्दारे ओळख करुन लग्नाचे आमिष अन् अत्याचार, अश्‍लील मेसेज पाठवून छेडखानी याप्रकारे गंभीर घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे गेल्या काळात घटलेल्या घटनांवरुन समोर आले आहेत. या घटना टाळण्यासाठी तरुणींनी सोशल मिडीयासह इतर माध्यमांचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच सोशल मिडीया वापरतांना आपली स्वतःची ओळख, सुरक्षितता याबाबत खबदारी घ्यावी, एवढा एकच उपाय या घटनांपासून वाचण्यासाठी आहे. समाजात बदनामी होईल, या भितीने अनेक तरुणी तक्रार देणे टाळतात, तक्रार न दिल्याने टवाळखोरांची हिंमत वाढून भविष्यातील गंभीर घटनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे तरुणींनी अशा प्रकाराबाबत गप्प न राहता वेळीच पोलिसात तक्रार दिल्यास भविष्यातील गंभीर टळता येवू शकतात.

दोन्ही घटनांमध्ये तरुणीची छेडखानी
शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसरात नुकतीच एक घटना घडली. उच्च शिक्षण घेणार्‍या 19 वर्षीय तरुणीच्या मोबाइलवर सलग 20 महिन्यांपासून वेगवेगळ्या नंबर वरून अश्लील मेसेज पाठवले जात होते. घडलेली ही घटना म्हणजे काही पहिली घटना नाही अश्या कित्येक घटना आपल्या आजूबाजूला घडतच असतात.व त्या आपल्या घरतील मुलींसोबत सुद्धा घडू शकतात. वेळीच तक्रार दिली असती, तर तरुणीला तब्बल 20 महिन्यांपासून संबधित टवाळखोराकडून होणार्‍या त्रासाला सामोरे जावे लागले नसते. तर दुसरी घटना याच्या उलट आहे, या घटनेत दुचाकीवरुन प्रवास करतांना तरुणाने तरुणीला अश्‍लील इशारा करुन छेड काढली. तरुणीने याबाबत आरडाओरड करुन तत्काळ पोलिसांना कळविले. त्यामुळे पोलिसांनी तरुणाला तत्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणात तरुणाच्या भविष्याचा विचार करुन गुन्हा दाखल झाला नाही. ही दुसरी गोष्ट आहे.

तरुणींनी काय घ्यावी खबरदारी
सोशल मीडिया वापरत असाल तर आपला संपर्क क्रमांक गोपनीय राहिल, तो सार्वजनिक होणार नाही याबाबत काळजी घ्या, अनोळखी क्रमाकांवरुन पुन्हा कॉल येत असेल तर संबधित क्रमांक ब्लॉक करा, प्रेम हे आंधळ असत, म्हणून सद्यस्थितीत फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर प्रेम बहरुन दोघेही विवाहबंधनात अडकतात. तरुणींनी प्रत्यक्षात भेट घेवून संबंधित तरुण, किंवा इतराबाबत माहिती काढूनच, ओळखी वाढवावी, लग्नाचे आमिष देवून शरीरसंबंधांची मागणी करत असेल, त्यास विरोध करा, लग्नापूर्वी संबंध प्रस्थापित करु नका, फोनवरुन बोलतांना प्रत्येकाची खात्री करुनच त्याच्यासोबत आपली स्वतःबद्दलची माहिती शेअर करा (जसे की, संपर्क क्रमांक, घराचा पत्ता, कौटुंबिक माहिती) याप्रमाणे तरुणींनी काळजी घेणे गरजेचे आहे. याप्रमाणे खबदारी घेतली, छेडखानीसह इतर गंभीर घटना टाळता येतील.

डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक
फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इन्टाग्राम, ट्वीटर यासह इतर सोशलमाध्यमांचा तरुणींनी सावधपणे व काळजीपूर्वक वापर करावा. कुणी त्रास देत असेल तर त्याबाबत कुटुंबियांना, तसेच पोलिसात कळवा. पोलिसांकडून तक्रारीची दखल घेवून तत्काळ कारवाई करण्यात येईल. व गंभीर घटना थांबेल. तरुणींनी अशाप्रकारे त्रास देणार्‍यांविरोधात न घाबरता, तक्रारीसाठी पुढे आले पाहिजे. जेणेकरुन आपल्यासोबत घडलेली घटना दुसर्‍या कुणासोबत घडणार नाही. व अशा घटनांवर अंकुश बसेल.

Copy