सोयी-सुविधा नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

जळगाव : शहरातील द्वारका नगर येथील नागरिकांना सांडपाणी, कचरा, रस्त्यांच्या सुविधा महानगर पालिकेतर्फे पुरविण्यात येत नसल्याने येथील महिलांनी मंगळवार 3 डिसेंबर रोजी आयुक्तांची भेट घेवून आपली तक्रार मांडली. मागील 5 वर्षांपासून सांडपाणी, पावसाचे पाणी, कचरा व रस्तेच्या समस्येमुळे आहुजा नगरजवळील द्वारका नगर यथील नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगर पालिकेकडे तक्रार देवूनही स्वच्छता तसेच रस्तांची कामे होत नसल्याने नागरिकांनी स्वखर्चांने सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नागरिकांनी स्वर्चांने येथे रस्ता तयार केला आहे.

पाच वर्षांपासून पाठ पुरावा
सांडपाण्याची विल्हेवाट होत नसल्याचे द्वारका नगरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. द्वारका नगर येथे 40 टक्के सैनिकांचे वास्तव्य आहे. पाच वर्षांपासून असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे यासाठी नागरिकांनी ऑक्टोबर महिन्यात महापौर व आयुक्तांना भेटून निवेदन दिले होते. यानंतर त्यांना लवकरच सर्व समस्या सोडविण्यात येतील असे आश्‍वासन देण्यात आले होते.

रस्त्याची दूरावस्था
निवेदन देवून दोन महिने उलटूनही महानगर पालिका प्रशासनाना जाग आलेली नाही. रस्ते चांगले नसल्याने महानगर पालिकेची घंटा गाडी तसेच तेथील रहिवाशांच्या मुलांसाठी असलेली स्कूल बस मुख्य रस्त्यांवरच करावी लागत आहे.