सोमवारी गोदावरी अभियांत्रिकीत ‘नॅक्टटेस्टम’ राष्ट्रीय परीषद

0

जळगाव। येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॅक्टटेस्टम’ या राष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय राष्ट्रीय परीषदेचे 21 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. या परीषदेत देशभरातील 100 संशोधक सहभागी होणार आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ. व्हि.जी. अराजपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपप्राचार्य प्रविण फालक, यांत्रिक विभागप्रमुख प्रा. व्ही. एच. पाटील व अधिव्याख्यता प्रा. व्ही. डी. चौधरी उपस्थित होते.

यांची राहणार उपस्थिती
प्राचार्य डॉ. अराजपुरे यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सध्याच्या संशोधनात्मक आविष्कारांना उत्पादनाच्या स्वरूपात व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणुन गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय परीषदेचे उदघाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.जी. गायकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन नागपुर व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन.एस.चौधरी, एस.बी.जैन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. डी.पी. कोठारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ यांच्यासह गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ. अनिकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

घाटोळ यांना जीवन गौरव पुरस्कार
या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत पाच विभाग करण्यात आलेले आहेत. याता इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजीनिअरींग , मॅकनेकील इजीनिअरिंग, इलेक्ट्रीकल इंजीनिअरींग, कॉम्प्युटर इंजीनिअरींग, अपलाईड इंजीनिअरींग अ‍ॅड मॅनेजमेंट स्टडीज् या पाच विभागातील प्रत्येकी एक उत्तम पेपर प्रेझेंट करणार्‍याला बेस्ट पेपर अवॉर्डने सन्मानीत करण्यात येणार आहे. या चर्चासत्रात पंतप्रधान यांनी भारताला 2020 साली सुपर पावर बनविण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. यात डिजीटल इंडीया, स्कील्ड इंडीया व मेकींग इंडीया संकल्पनांचा समावेश आहे. यानुसार जॉब ऑपरच्युनेटीबाबत चर्चासत्रात उहापोह केला जाणार आहे. खान्देशाचे नाव राष्ट्रीय स्तरावर जावून नवीन रोजगार संधी उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. डॉ. आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ यांना यावेळी जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी दिली.