सोफराजाकडून दीड लाखांच्या ऐवजासह पाच दुचाकी हस्तगत

0

जळगाव । अट्टल घरफोट्या सोपराजा उर्फ राजेंद्र दत्तात्रेय गुरव (वय 28, रा. आसोदा रोड) याला रामानंदनगर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत असताना त्याच्याकडून पोलिसांनी चार घरफोड्यांमधील दीड लाखांचा ऐवज आणि पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने अट्टल घरफोड्या सोपराजा उर्फ राजेंद्र दत्तात्रेय गुरव याला 29 एप्रिल रोजी अटक केली होती. त्याने पोलिस कोठडी दरम्यान रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4 घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्या घरफोड्यांमधील एकूण दीड लाखांचा ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला आहे. तसेच शहरातून चोरलेल्या पाच दुचाकीही त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत. गुरव कारागृहात असताना त्याचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील गुन्हेगारांशी ओळख झाली. त्यातून नाशिक, नगर, औरंगाबाद, अमळनेर, सुरत मधील काही गुन्हेगारांनी वेगवेगळ्या टोळ्या बनवल्या आहेत.