Private Advt

सोपान नगरात आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक

जळगाव : शहरातील सत्यम पार्कजवळील सोपान नगरात घराला आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी अमळनेर तालुका पोलिसात आगीची नोंद करण्यात आली.

तालुका पोलिसात नोंद
शहरातील सत्यम पार्कमधील सोपान नगरात सुनीता शरद पाटील या वास्तव्यास आहेत. 27 रोजी रात्री 8 ते 29 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील भांडे, कपडे, लाकडी पलंग, गादी यासह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामन विभागाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली. या प्रकरणी सुनीता पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली.