सोन्याच्या दरात १,२०० रुपयांची घसरण

0

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात २.५ टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दिवसभरात सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२०० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. सोन्याचा भाव १,२८६ रुपयांच्या घसरणीसह ४८,१२३ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाली असून एक किलोग्रम चांदीचा भाव सध्या ७२,८७० रुपये इतका झाला आहे.

मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाली. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याआधी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. एमसी÷एक्स वेबसाइटच्या माहितीनुसार सकाळी ९.०५ मिनिटांनी १८५ रुपयांच्या वाढीसह सोन्याचा भाव ४९,२८१ रुपये इतका होता. तर चांदीचा दरही १९४४ रुपयांच्या वाढीसह ७१,६५० रुपये इतका नोंदविण्यात आला होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचा दरात कमालीची घसरण झाली. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदीखरेती करू इच्छिणार्‍या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Copy