सोन्याच्या दरात मोठी घसरण; ३९ हजार ६६१ प्रतीतोळा

0

नवी दिल्लीः जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव जागतिक बाजारपेठेवर पडला असून, जगातील अनेक शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, मागील १० दिवसांत सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ३९ हजार ६६१ रुपये एवढे झाले आहेत.

१० ग्रॅम सोन्याचे दर १९४९ रुपयांनी घसरले असून, ३९ हजार ६६१ रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो ६ हजार ४४५ रुपयांनी घसरले आहे. सोमवारी दिल्लीत सोने ४५५ रुपयांनी वाढून ४१ हजार ६१० रुपये प्रति १० ग्रॅम झाले होते. चांदी मात्र १ हजार २८३ रुपयांनी घसरून ४० हजार ३०४ रुपये किलो झाली. शुक्रवारी सोन्याचे दर १० ग्रॅमसाठी ४२ हजार १७ रुपयांवर बंद झाले होते.

सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंचा व्यापार केवळ सराफा बाजारातून होत असतो. सोन्याची दोन प्रकारे खरेदी केली जाते. सामान्य लोक सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. त्याचबरोबर व्यावसायिक लोक हे वायदा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. कोरोनाचा प्रभाव सोन्याच्या भावावर सर्वाधिक पडला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने अन् चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

Copy