सोनियांसह राहुल गांधींना धक्का

0

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने आयकर विभागाला तपास करण्याचे आदेश दिले आहेत. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये संचालक आहेत.

यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तपासणीचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी या कंपनीत संचालक असल्याने त्यांच्या अडचणीत या निर्णयामुळे वाढ होणार आहे. याआधी पटियाळा उच्च न्यायालयाने राहुल आणि सोनिया गांधी यांना फसवणुकीचे षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. यंग इंडियाने केवळ 50 लाख रूपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळविल्याचा आरोप सोनिया तसेच राहुल गांधी यांच्यावर आहे.

याआधी नॅशनल हेराल्ड प्रकरणत डिसेंबर 215 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी पटियाळा हाउस न्यायालयासमोर हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही जामीन दिला होता. यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना जामीन मिळाल्याबददल नाराजी व्यक्त केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने पटियाळा हाउस न्यायालयाचा निकाल रदद केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने आयकर विभागाला यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तपासणीची परवानगी दिली.