सोनम कपूरचाही तनुश्रीला पाठिंबा

0

मुंबई : सध्या बॉलीवूड मध्ये तनुश्री दत्ता खूप चर्चेत आहे. तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेर होती. भारतात परतताच तिने बॉलिवूड सोडून निघून जाण्यामागचे कारण उघड केले. तनुश्रीने नाना पाटेकर, कोरियोग्राफर गणेश आचार्य, निर्माते सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावर असभ्य वर्तन आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला खोटे ठरवले. मात्र, आता अनेक बॉलिवूड कलाकार तनुश्रीला पाठिंबा देताना दिसत आहेत. फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, ट्विंकल खन्ना, स्वरा भास्कर या कलाकारांपाठोपाठ आता सोनम कपूरनेही तनुश्रीला सपोर्ट करत आहे. रिपोर्टर जैनिस सीकेरियाने तनुश्रीने केलेले सगळे आरोप खरे असून मी स्वत: तिथे उपस्थित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, सोनमने जैनिस माझी चांगली मैत्रिण असून ती कधीही वाढवून आणि खोटं सांगणार नाही. त्यामुळे, आपण तनुश्रीला सपोर्ट करायला पाहिजे असे म्हटले आहे.

Copy