सोनबर्डी-खडके खुर्द वळणावर अपघात; युवक ठार; अपघातस्थळी आंदोलन

0

एरंडोल : तालुक्यातील सोनबर्डी फाटा-खडके खुर्द वळणावर आज बुधवारी सकाळी दुचाकीचा अपघात झाला. यात एक युवक जागीच ठार झाला आहे. सचिन मधुकर पाटील (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. एम.एच १९ बी.आय २५३७क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना वळणावर नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर या ठिकाणी संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हे ठिकाणी अपघाताचे हॉटसस्पॉट ठरले आहे. येथे अपघात नित्याचेच झाले आहे. मयत सचिन पाटील हा धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथे वास्तव्यास आहे. दुचाकीने कासोद्याकडून एरंडोलकडे येत असताना सोनबर्डी फाट्यापासून जवळील खडके खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. पाटील चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. हेडकॉन्स्टेबल विकास देशमुख राजू पाटील हे पुढील तपास करीत आहे.

Copy