सै.नियाज अली भय्या फाऊंडेशनतर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली

0

जळगाव । येत्या 14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त सै.नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे रविवार 9 रोजी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करुन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलेले होते. मिरवणूकीचे उद्घाटन हाजी युसूफ अली यांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणूकीची सुरुवात सकाळी 10.30 वाजता भिलपूरा येथील इमाम अहमद रजा चौक येथून झाली. घाणेकर चौक, टॉवर चौक, नेहरु चौक मागे रेल्वे स्थानकावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापर्यत मिरवणूक काढण्यात आली.

बाबासाहेबांच्या जीवनावर टाकला प्रकाश
बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले. आयोजक अयाज अली नियाज अली यांनी सर्वांना सामुहिक संविधान वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात अयाज अली नियाज अली यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत सांगितले की, आपला सर्वांनी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वागावे, शिका, संघर्ष करा, बाबासाहेबांच्या विचाराशी संप्रेरीत होवून देशसेवा करावी, बंधूना एकता टिकवावी असे सांगितले. मिरवणूकीचे नेतृत्व अयाज अली नियाज अली यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक राजू मोरे, दिपक पवार, नाज मोहंमद शेख शफी, फिरोज पिंजारी, फिरोज खान, हाजी मोहंमद, शेख शफी, मुकेश परदेशी, इरफान खान, दिनेश लखारा, अब्दुल जुम्मन,नाजीम कुरेशी, शेख रईस, शरीफ खान, सै.इरफान, मोहसीन कुरेशी, शफीक शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

शहर समितीतर्फे आवाहन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या शुक्रवारी 14 एप्रिल रोजी 126वी जयंती आहे. समाज बांधवानी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करावी असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केले आहे. गुरुवार 13 रोजी रात्री 12 वाजेपासून शुक्रवार रात्री 12 वाजेपर्यंत जयंती उत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ढोल, ताशे, लेझीम पथकाचं शिस्तबध्द आयोजन, मिरवणूकीत सामिल होणार्‍या प्रत्येक मंडळास उत्तेजनार्थ ट्रॉफीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत भिम गीत गायनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.