Private Advt

सैताने येथे साजरा झाला विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

सैताने – नंदुरबार तालुक्यातील सैताने गावात जिल्हा परिषद  शाळेत मोठ्या उत्साहत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला

  मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने मुलांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत सरपंच नानाभाऊ पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र बुवा, पालक वर्ग, मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत मोठ्या आनंदाने मुलांचे स्वागत करून प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला.

 

यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेतर्फे विद्यार्थ्यांचे ज्याप्रकारे स्वागत झालेल्या मुळे विद्यार्थी व त्यांचे पालक खुश झाले होते. व येत्या काळात चांगला अभ्यास करून शाळेचे नाव उंच करणार असल्याची प्रतिज्ञा यावेळेस विद्यार्थ्यांनी घेतली.