सेवा ज्येष्ठतेसाठी ‘जयहिंद’च्या शिक्षिकेचे उपोषण

0

धुळे । येथील जयहिंद हायस्कुलमध्ये उपशिक्षिका असलेल्या पुष्पा अशोक पाटील यांनी सेवा ज्येष्ठतेच्या न्याय हक्कासाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अखंड सेवेचा सुरुवातीचा दिनांक हा सेवा ज्येष्ठतेसाठी प्रमाण मानला जातो. दोन व्यक्तींचा हा दिनांक सारखा असल्यास त्या व्यक्तीच्या वयानुसार विचार करुन सेवा ज्येष्ठता ठरविले जाते. असे असतांना माझी सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली आहे. या प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रविण पाटील व वरिष्ठा कारकून रविंद्र बोरसे यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.

‘त्या’ अधिकार्‍यांना निलंबित करावे
न्यायासाठी गेली 3 वर्षे आपण भांडत असून न्यायालय, शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी केवळ सुनावणी घेवून न्याय देण्यास टाळाटाळ केल्याने अखेरीस 1 मार्च 2017 व 13 एप्रिल 2017 रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला. तथापि तांत्रिक कारणामुळे त्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आल्याने आज नाइलाज म्हणून हे उपोषण करावे लागत आहे.या प्रकरणी कार्यालयातील रविंद्र बेडसे यांना निलंबित करावे. 4 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षणाधिकारी पाडवी यांच्यामुळे बर्याच शिक्षकांचे नुकसान झाल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही बसविणे व मला सेवा ज्येष्ठता देण्यात यावी अशा 3 मागण्या पुष्पा पाटील यांनी केल्या असून त्या मान्य न झाल्यास 8 मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिल आहे.