Private Advt

पाकिस्तानवर मोठा हल्ला! 100 हून अधिक जवान ठार

इस्लामाबाद – बलुचिस्तानमध्ये बलोच लिबरेशन आर्मीच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर आक्रमक हल्ला केला आहे. ज्यात 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बलोच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात फ्रंटियर कोरचे आयजी मेजर जनरल अयमान बिलाल सफदर यांचाही जागेवर मृत्यू झाला आहे.

सध्या पाकिस्तानी सैन्य आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांच्यात जबरदस्त युद्ध सुरु आहे. एकाचवेळी दोन ठिकाणांवर झालेल्या हल्ल्याने पाकिस्तानी सैन्याला कुठलंच पाऊल उचलण्याचीही संधीही मिळाली नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्य मारले गेले. बलुचिस्तानमधील लोकं गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. जगातील विविध व्यासपीठावर बलुचिस्तानचे प्रतिनिधी याबाबत सातत्याने आवाज उचलत आहेत.