सेतू केंद्राचे नुकसान करणाऱ्यास अटक

0

न्यायालयात हजर केले असता दिली पोलीस कोठडी

जळगाव – रजा कॉलनी शेरा चौकामधील सेतू सुविधा केंद्रात बळजबरीने घुसुन एकाला दमदाटी करून दुकानाचे नुकसान करत गल्ल्यातील पाच हजार 500 रूपये हिसकावल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेहरूण कॉलनीत असलेल्या रजा कॉलनीत सेतू सुविधा केंद्र व मानीट्रान्सफर केंद्र इमरान खान मुनवर खान (वय-40) यांचे असून 30 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास आरोपी मोहसीन हमीद मन्यार उर्फ दत्ता हा सेतू केंद्रावर मतदान कार्ड बनविण्यासाठी कागदपत्रे घेवून आला मात्र मोसीनच्या दाखल्यावर खडाखोड असल्याने त्याला इमरान यांनी परत पाठविले. सायंकाळी 6.30 ते 6.45 वाजेदरम्यान आरोपी मोहसीन हमीद मन्यार यांच्यासह एकाने दुकानात येवून दुकानाची नासधुस करून नुकसान केले आणि गल्ल्यातील 5 हजार 500 रूपये काढून आधार कार्ड थम्प मशीनचे नुकसान केले. इमरान खान मुनवर खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पोलीसांनी आरोपी मोहसीन हमीद मन्यार उर्फ दत्ता याला मास्टर कॉलनीत पोलीस पथकातील अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन मुडे, समाधान पाटील, निलेश पाटील यांनी पाठलाग करूनपाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Copy