सॅमसंगचे प्रमुख जे. वाय. ली यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक

0

सेऊल । स्मार्टफोनसह अन्य इलेक्ट्रोॉनिक उत्पादनांच्या क्षेत्रात जगभरात अग्रेसर असलेल्या सॅमसंग कंपनीचे प्रमुख जे. वाय. ली याला भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियात नुकतीच भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवण्यात आली. त्यात ली यांना अटक करण्यात आली. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनाच लाच देऊ करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अध्यक्षांना लाच देऊन कंपनीच्या फायद्याचे निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप ली यांच्यावर ठेवण्यात आला असून, ली याच्या अटकेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत दक्षिण कोरियात अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यात सॅमसंग कंपनीच्याही काही अधिकार्‍यांचा समावेश आहे. या अधिकार्‍यांपासून ली याला लांब ठेवण्यात आले आहे. या अधिकार्‍यांशी चर्चा करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच, ली याला सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.