सूर्यकांता राज्यस्तरीय एकांकिका करंडक स्पर्धा 25 पासून

0

धुळे । खान्देशातील स्थानिक कलावंताना प्रेरणा मिळावी, या हेतुने एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या (कै.) डॉ.सूर्यकांता अजमेरा यांच्या स्मृतीनिमित्त रोटरी कल्ब ऑफ धुळे विद्यानगरीतर्फे सूर्यकांता अजमेरा राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा धुळे शहरात आयोजित करण्यात आली आहे. खान्देशातील युवकांना एकाच व्यासपीठावर विविध मनोरंजन नाट्य कलेच्या अविष्कारासाठी शहरातील हिरे भवन येथे शनिवार, दि.25 ते 26 फेब्रुवारी दरम्यान सूर्यकांता एकांकिका करंडक स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत खान्देशातील युवकांसह राज्यभरातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे.

स्थानिक कलावंताचा प्रतिसाद
हिरे भवन येथे दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेदरम्यान सूर्यकांता राज्यस्तरीय करंडक एकांकिका स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेस स्थानिक कलावंताचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत धुळे, जळगाव, नाशिक, अमळनेर, मुंबई, डोंबिवली, कल्याण, पुणे, अहमदनगर येथील कलावंत कला सादर करणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आणि अतुल अजमेरा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रकल्प प्रमुख कैलासपती चित्तम, प्रकल्प सचिव वैभवकुमार जगताप, रोटरी कल्ब विद्यानगरीचे अध्यक्ष शैलेश पाटील, सचिव रविंद्र पाटील, उदय गुजर उपस्थित राहणार आहेत.
या एकांकिकेचे सादरीकरण

दि.25 फेब्रुवारी रोजी चिंगी -आयएमआर कॉलेज जळगांव, सुसाईड – जी.डी.बेंडाळे कॉलेज जळगांव, सायलेंट स्कीम – व्हिजीकिष, नाशिक, दगड – भुमी संस्था जळगांव, निष्फळ – कलाविष्णू संस्था अमळनेर, सांबरी – समर्थ संस्था जळगांव, मजार – राज थिएटर जळगांव, दिक्षा – सृष्टी संस्था नाशिक, चेला – मॅड स्टुडिओ धुळे, लक्ष – व्हिजीकिषा अ‍ॅकॅडेमी मुंबई येथुन आलेले कलावंत या एकांकिका सादर करणार आहेत. तर दि. 26 फेब्रुवारी रोजी वारुळातील मुंगी – रंगकर्मी थिएटर नाशिक, कैरी – मानवता धुळे, अ-आईचा बा-बापाचा प्रियकला पुणे, मेड फॉर इच ऑदर – स्वामी नाट्य संस्था डोंबिवली, साकव – संक्रमण संस्था पुणे, माईक – मल्हार संस्था अहमदनगर, दर्द ए पोरा – अभिनव कल्याण आणि एक्सपायरी डेट – क्युरियस थिएटर मुंबई येथुन आलेले कलावंत या एकांकिकांव्दारे विविध कलागुण दाखविणार आहेत.