सूचित देशमुख याचा निबंध ठरला सर्वोत्तम

0

नवी मुंबई । मुलुंड येथील खासदार किरीट सोमय्या यांच्या वतीने माझ्या स्वप्नातील भारत या विषया वर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ऐरोली येथील सूचित देशमुख याचा निबंध सर्वोत्तम ठरला. सूचित देशमुख याचा सत्कारही खासदार सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

मुलुंड मधीलच वाणी विद्यालयाच्या 12 वि विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या सूचित देशमुख यांनी सहभाग घेतला होता. निबंधाची तपासणी अंती 100 विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली. त्यामध्ये सूचित देशमुख याचा निबंध सर्वोत्तम ठरला. मुलुंड विद्यालयात सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार सोमय्या यांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक, भेट वस्तू व भारतीय ध्वजाची प्रतिकृती देऊन करण्यात आला. या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांचे निबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकाकडून सांगण्यात आले. सूचित देशमुख हा ऐरोली येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुणांनी पास झाला होता. त्याचा निबंध सर्वोत्तम ठरल्याने वाणी विद्यालयात व ऐरोली परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

Copy