सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षणासह चांगल्या विचारांची गरज

0

अमळनेर । सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षणासह चांगल्या विचारांची गरज असते म्हणुन माणसाने शिक्षणासह चांगले सकारात्मक विचार जोपासले तर तो जिवनांत नक्कीच यशस्वी होतो असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील पद्मश्री अ‍ॅड.उज्वल निकम यांनी केले.अमळनेर येथील अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आपल्या मुलांना टिव्ही वरील मालिका दाखविण्यापेक्षा त्यांना चांगला खेळाडू होण्यास प्रोत्साहित करा असेही ते म्हणाले. यावेळी सामान्य कुटुंबातील विद्यार्थींना चांगले शिक्षण मिळत असल्यामुळे संस्थेचे कौतुक केले.

मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.ललिता पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शक केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, के. बी. पाटील, संचालक पराग पाटील, प्रा.पी.बी.महाजन, देवेश्री पाटील, मयुरी पाटील, प्राचार्य श्रुतीरंजन बारीक, उपप्राचार्या स्मिनिला विनोद आदी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धापरीक्षा, राज्य व जिल्ह्यास्तरीय खेळांमधे प्राविण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध गितांवर नृत्य सादर करुन व ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, झाडे लावा, झाडे जगवा, अंधश्रद्धा निर्मूलन यांच्यावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. प्रास्ताविक प्राचार्य श्रुतिरंजन बारीक यांनी केले तर आभार प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी माणले.