सुषमा स्वराज यांच्या निर्णयाचा पतीने केला स्वागत; मानले आभार

0

नवी दिल्ली-केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी काल आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाचे त्यांचे पती स्वराज कौशल यांनी आभार मानले आहे. एकवेळ अशी होती त्यावेळी मिल्खासिंग यांनी देखील धावणे बंद केले होते, अशी प्रतिक्रिया सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी दिली आहे. कौशल मिझोरामचे माजी राज्यपाल राहिलेले आहे. ट्वीटरवरून पतीने सुषमा स्वराज यांचे

सुषमा स्वराज यांचा राजकीय प्रवास १९७७ पासून सुरु आहे, ४१ वर्ष झाले ते राजकारणात आहेत. ११ निवडणुका त्यांनी लढविल्या, फक्त १९९१ ते २००४ दरम्यान त्यांनी पक्षाच्या आदेशान्वये निवडणूक लढविली नव्हती. मागील ४७ वर्षापासून मी तुमच्या मागे धावतो आहे. आता मी पण १९ वर्षाचा नाही राहिलो, आता मी थकलो आहे अशा शब्दात पती स्वराज कौशल यांनी ट्वीटरवर लिहिले आहे.

Copy