सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे; पार्थ पवार म्हणतात ‘सत्यमेव जयते’

0

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी देखील सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी केली होती. यावरूनच राष्ट्रवादीत दुमत दिसून आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरूनच पार्थ पवारला फटकारले होते. पार्थ पवार अपरिपक्व असून त्याच्या मागणीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही असे विधान केले होते. त्यावरून राजकारण तापले असताना आता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिले आहे. या निकालाचे स्वागत पार्थ पवार यांनी केले असून त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले आहे.

यावरून पार्थ पवार याची नाराजी अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. पार्थ पवार नाराज असल्याने त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न पवार कुटुंबीयांनी केली.