सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: कोणत्याही क्षणी होऊ शकते रियाला अटक

0

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात त्याची कथित प्रियशी रिया चक्रवर्तीकडे आरोपी म्हणून पहिले जात आहे. यापूर्वी रिया चक्रवर्तीची ईडीमार्फत चौकशी झाली आहे. मात्र सीबीआयने रियाची चौकशी केलेली नाही. परंतु रियाव्यतिरिक्त इतरांची चौकशी केली असता, त्यात सीबीआयकडे पुरेसे पुरावे असल्याचे बोलले जात असून सीबीआय कोणत्याही क्षणी रियाला अटक करू शकते अशी माहिती समोर आली आहे.

रियाला अटक होईल इतके पुरावे सीबीआयकडे आहेत अशी माहिती समोर आली आहे. सीबीआय चौकशीचा आज २६ ऑगस्ट रोजी सहावा दिवस आहे. मुंबईत सीबीआयचे वेगवेगळे पथक मुंबईत दाखल झाले आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागले आहे. सुरुवातील महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्याने सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला.