सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख

0

नवी दिल्ली: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण लागत आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने राजकारण देखील तापले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयतर्फे करण्याची मागणी होऊ लागली. हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात देखील हे प्रकरण पोहोचले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाशी महाविकास आघाडीतील मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याच्या चर्चा आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांचा रिया चक्रवर्ती यांच्याशी काहीही संबंध नाही. दोन्ही एकमेकांना कधी भेटलेले देखील नाही अशी माहिती रिया चक्रवर्तीच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दिली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरे यांचा नावाचा उल्लेख झाला आहे.

Copy