सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार

0

आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल पुरुष स्पर्धा
जळगाव- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल पुरुष स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला सुवर्ण पदक प्राप्त करुन देणाज्या खेळाडूंचा सत्कार कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात या स्पर्धा नुकत्याच झाल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अखिल भारतीय पातळीवर सुवर्णपदक प्राप्त केले. त्यानिमित्त खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार झाला. संघात सुमेध तळवेलकर,कल्पेश कोल्हे, प्रतिश पाटील (मु.जे.महाविद्यालय, जळगाव), सागर पाटील, गौरव चौधरी, श्रीराम चव्हाण, अभिजित सोनवणे, कल्पेश जाधव,आकाश महाजन (नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव), धिरजकुमार वाणी (आय.एम.आर.जळगाव), मयुरेश औसेकर,मोहित पाटील (बाहेती महाविद्यालय, जळगाव), चंद्रदीप पाटील (नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज अभियांत्रिकी महा.जळगाव), धिरज सोनवणे, हर्षदीप चव्हाण (य.ना.चव्हाण महा.चाळीसगाव), सचिन गाडीलोहार,अमरसिंग गिरासे (पूज्य साने गुरुजी महा.शहादा), अमोल जावरे (जिजामाता महा.नंदुरबार) यांचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक जयंत जाधव होते . या सत्काराच्या वेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, खो-खोपटू सुप्रिया गाढवे, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी, दीपक पाटील, डॉ.जितेंद्र नाईक, विवेक लोहार, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर तसेच क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील उपस्थित होते.

Copy